ग्रामीण

रस्ता नाही तर मतदान नाही” संतप्त ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; २३२ मतदार असलेल्या हरणमाळ गावचा निर्णय…

“रस्ता नाही तर मतदान नाही” संतप्त ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; २३२ मतदार असलेल्या हरणमाळ गावचा निर्णय… नंदुरबार दि. ३०(प्रतिनिधी ) नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत देवळीपाडा अंतर्गत हरणमाळ गावाचे ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावित, अजित गावीत यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा कार्यालय नंदुरबार मार्फत मा. आयुक्त सो. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र, मा-मुख्यमंत्री सो.मंत्रालय, डॉ. मादाम कामा रोड, मुंबई यांना निवेदन देण्यात आले आहे. “रस्ता नाही तर मतदान नाही” हरणमाळ (नवीन देवळीपाडा) गावातील शेकडो नागरिकांचा लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कारचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षानंतरही नवापुर तालुक्यातील हरणमाळ (नवीन देवळीपाडा) येथे रस्ता पक्के नसल्यामुळे बारमाही विद्यार्थीसह वस्तीवरील नागरिकांना रस्त्यावरील जीव घेणे संघर्ष करावे लागत आहे, अनेक वेळा अपघात घडले आहे, २०२४ लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेतला आहे, पावसाळ्यात चार महीने चिखलाणे रस्ता पूर्ण पणे भरलेला असतो, पावसाने सर्वत्र नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो, यामुळे पाणी वाहण्यासोबतच सर्वत्र दलदलीची परिस्थिती असते. वाहत्या पाण्यातून आणि चिखलातून जीव घेणाप्रवास करावा लागत आहे. शाळेसह दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी गावात येण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने जिवघेणा संघर्ष करावा लागत आहे, शासनाने गाव तेथे रस्ता अभियान राबविले, मात्र या योजना गरजू लोकांपर्यंत पोहचल्याचे दिसत नाही, त्यामुळे अनेक वर्ष वस्तीत वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांसह त्यांच्या पाल्यांना शिक्षणासह विवीध गरजा भागविण्याकरीता गावात येताना अनेक संकटाचा सामना करत गाव गाठावे लागते, हरणमाळ (नवीन देवळीपाडा) कुटुंबीय अनेक वर्षा पासून वास्तव्य करून राहतात, वस्तीच्या मध्यभागी मोठी नदी असून बोरीफाटा वस्तीपासून हरणमाळ (नवीन देवळीपाडा) पर्यंत रस्ता कच्चा आहे. एकंदरीत वैतागलेल्या नागरिकांनी रस्ता नाही तर मतदान नाही असा निर्णय केला असून यासंबधी देवळीपाडा ग्रामपंचायत सदस्य श्री. कल्पेश गावीत, श्री. अजित गावीत म्हणाले, निवडणुक आली की सर्व राजकीय पदाधिकारी आमचे वस्तीवर येतात, आश्वासने देतात व एकदा निवडणूक संपली की कुणी आमच्याकडे डोकावूनही पाहत नाही. त्यांना केवळ मतांसाठी आमची आठवण येते, मात्र आता “रस्ता नाही तर मत नाही” आमचे वस्तीवर २३२ मतदार आहे, परंतु आम्ही अनेक वेळेस प्रशासनाकडे रस्त्यासाठी पाठपुरावा करूनही उपयोग होत नाही. निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी आलेले नेते रस्त्याचे आश्वासन देतात. मात्र निवडणुका संपल्या की पुन्हा जैसे थे परिस्थिती राहते. त्यामुळे आता जोपर्यंत रस्ता मिळत नाही; तोपर्यंत मतदार करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. निवडणूक आता चांगले रंगात आली असून निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांना आता अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे. कुणीच रस्ता होईपर्यंत मतदान करणार नाही शंभर टक्के बहिष्कार टाकणारच या उद्देशाने आम्ही सर्व नागरिक यांनी २०२४ लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा कटाक्षाने निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}