नांद्रा हवेली येथे रस्त्या वरून गटारी वाहत असल्याने नागरिक हैराण
स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडूनआवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, नांद्रा हवेली तालुका जामनेर येथे वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.
स्वच्छतेवर किती खर्च होतो?
मात्र, नांद्रा हवेली तालुका जामनेर या ग्रामपंचायतीला किती निधी मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. शहरातील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडूंब भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. शहर व ग्रामीण स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते.
या ठिकाणी असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास याचे विपरीत परिणाम हे ग्रामीण वासियांना भोगावे लागतील. तेव्हा शासनाच्या लाखो-करोडो रुपयांच्या स्वच्छतेकरिता येणाऱ्या निधीचा काय उपयोग? अन येणारा निधी स्वच्छतेच्या उपाययोजनांवर खर्च न करता तो कोठे खर्ची होतो? हे ग्रामीण भागाच्या अस्वच्छतेच्या परिस्थितीवरून स्पष्टच होत असल्याने आता नागरिकांमध्ये कोरोनाच्या पाठोपाठ अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या भितीने नागरिकांच्या मनात आणखीच भीती निर्माण झाली आहे.
-नांद्रा हवेली तालुका जामनेर वार्ड क्रमांक १ मध्ये दोन वर्षे झाले रस्त्यावरून गटारी वाहत आहे ग्रामस्थ हैराण आहे तरी कुठलीच मदत होत नाही ग्रामपंचायतला वारंवार सांगू नही काम होत नाही यामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्रयात आहे .
रस्त्यावरूनच घाण दुर्गंधी युक्त पाणी खुल्या गटारी मार्फत वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .
प्रशासनाच्या कानावर बऱ्याच वेळा ही बाब टाकून ही कोणीच दखल घ्यायला तयार नाही निगरगठ्ठ प्रशासणातील अधिकारी झाल्याचे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे .
तात्काळ सदरील समस्या न सोडवल्यास आंदोलनाच्या पावित्र्यात नागरिक आहेत .
शासनाने ठोस पावले उचलावीत
तेव्हा नागरिक शासन-प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवत असताना प्रशासनाने अशाप्रकारे नागरिकांच्या जिवित्वाशी खेळण्याच्या चालविलेल्या या प्रकाराला काय म्हणावे? अन या सर्व प्रकारास जबाबदार कोण? हाही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात असून शासनाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर शासनानेच ठोस अशा कारवाया करत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.



