नंदुरबारच्या शिक्षणाधिकाऱ्यांना 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले:नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
नंदुरबारच्या शिक्षणाधिकाऱ्यांना 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले:नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश सुरेश चौधरी (वय 50, रा. वाघेश्वरी मंदिराजवळ, नंदुरबार, मुळ रहिवाशी मुक्ताईनगर, जिल्हा-जळगांव) यांना तक्रारदार कडून 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले लाचखोर शिक्षणधिकाऱ्याला आज अटक करण्यात आली आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना नवापूर शहर, नगरपालिका, मालमत्ता क्र. 826, सीटी सर्वे क्र. 624, पंचरत्न शॉपिंग, काँप्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरु करावयाची असल्याने सदर परिसरात 75 मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL 3 परवाना देण्यास हरकत घेतली.
परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून सदर शाळा बंद असले बाबत प्रमाणपत्र देणेसाठी तसेच अशरफ भाई माजिदभाई लखानी अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माद्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून 50 हजाराची मागणी करुन आज दि. 15 मे 2024 रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात ५० हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून यातील लाचखोर प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी याच्यावर नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.