मा. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या तर्फे विनोद शेंडगे यांचा सत्कार, पुस्तक वाचन स्पर्धा जनजागृतीसाठी परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास
मा. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या तर्फे विनोद शेंडगे यांचा सत्कार, पुस्तक वाचन स्पर्धा जनजागृतीसाठी परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास
नंदुरबार दि. १०( प्रतिनिधी) अक्षर आनंद मागील पाच वर्षापासून वाचन संस्कृती समाजात रुजविण्यासाठी कार्य करते. सहकुटुंब पुस्तक वाचनानेच विद्यार्थ्यांवर वाचनाचा संस्कार होतो. सहकुटुंब वाचन करू कुटुंबाला समृद्ध करू. या उद्देशाने अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांचा सायकल प्रवास हा परभणी, जिंतूर, मंठा, लोणार, बुलढाणा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, धुळे, दोंडाईचा, नंदुरबार येथे शहरात विविध ठिकाणी जनजागृती करत आमदार कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषद मा. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विनोद शेंडगे यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालय या ठिकाणी समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विनोद शेंडगे यांचा सत्कार शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संघाचे संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पितांबर सरोदे, उपाध्यक्ष रमाकांत पाटील, केतनभाई शहा, जिजामाता कॉलेज माजी प्रिन्सिपल बी.एस. पाटील, निंबाजीराव बागुल, रेवा फाउंडेशन अध्यक्षा डॉ. समिधा नटावदकर, डी. आर. हायस्कूल मुख्याध्यापिका सुलभा महिरे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, तसेच जिल्ह्यातील वाचनप्रेमी पत्रकार, ग्रंथालय कार्यकर्ते आदी उपस्थित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे .ही स्पर्धा ७ जून ते ३१ डिसेंबर या दरम्यान असून, उत्कृष्ट वाचकांचा सन्मान चिन्ह ,सन्मानपत्र, ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात येणार आहे. दररोज दहा पाने वाचून पाच ओळी सार लिहू. बालवाचकांनी किमान पाच पाने वाचू. नोंदी केलेली वही ३१ डिसेंबर नंतर अक्षर आनंद ही वाचनाची चळवळीच्या समन्वयकाकडे जमा करू. विचारी, संवेदनाशील माणूस घडला पाहिजे. वाचनाचा लळा, फुलवी जेवणाचा मळा हे घोषवाक्य घेऊन वाचन चळवळ कार्य करते. वाचनाचे महत्त्व सर्वांनाच माहित आहे. परंतु वाचले मात्र जात नाही. म्हणून अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र समाजाला वाचनाचे पाच कृती कार्यक्रम देते. सहकुटुंब पुस्तक वाचन करू, वाचनासाठी निमित्त शोधू, पुस्तक वाचन स्पर्धा, वाचन संस्कार केंद्र, मी वाचलेले पुस्तक या पाच कृती कार्यक्रमाची रुजवात समाजात व्हावी. यासाठी महाराष्ट्राभर अक्षर आनंद वाचन चळवळ कार्य करते. समृद्ध नागरीक घडविण्याच्या या चळवळीत व सहकुटुंब वाचन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी केले आहे. वाचनाने मन तर सायकलिंगने मनगट मजबूत करू. हा संदेश देत संपूर्ण महाराष्ट्र सोलो सायकल प्रवास विनोद शेंडगे करत आहे.