राजकीय
खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही ! – मंत्री गिरीश भाऊ महाजन
जामनेर -( वृषभ इंगळे ) जामनेर प्रतिनिधी
केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना दिला जाणारा विकासनिधी हा राज्यघटनेच्या कलम २८० अन्वये १५ व्या वित्त आयोगाने ठरवून दिलेल्या प्रमाणातच दिला जातो.
असे असतानाही प्रत्येक वेळी निधी वितरित झाल्यानंतर “महाराष्ट्रावर अन्याय झाला” अशी खोटी बातमी विरोधकांकडून पेरली जाते. हा संविधानाचा अपमान असून परिस्थितीची जाणीव असतानाही महाराष्ट्रातील जनतेची होणारी ही फसवणूक आहे.
मात्र, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही हा विश्वास आहे.