राजश्री शाहू महाराज गौरव या पुरस्काराने अरविंद गावीत यांचा सन्मान.
राजश्री शाहू महाराज गौरव या पुरस्काराने अरविंद गावीत यांचा सन्मान.
नंदुरबार दि. ११( प्रतिनिधी) राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच कार्यक्रम पार पडला. अक्कलकुवा तालुक्यातील अरविंद होळ्या गावित जिल्हा परिषद शाळा माट्याबारीपाडा यांना सन 2024 चा राजश्री शाहू महाराज गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्रोचे अभियंता श्रीयुत नगीनजीं प्रजापती हे होते. या पुरस्काराचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय पवार सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील अरविंद गावीत सरांनी ग्रामीण भागात शाळेत विविध उपक्रम, आणि सामाजिक विविध उपक्रम राबविले तसेच मुलांची उपस्थिती वाढीसाठी व गुणवत्ता वाढीसाठी विविध शालेय व सहशालेय उपक्रम राबविले आहेत. अरविंद गावित हे मूळचे बेडकी तालुका नवापूर येथील रहिवासी असून अक्कलकुवा तालुक्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल नवापूरचे शिक्षण विस्तार अधिकारी रमेश देसले, अक्कलकुवा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी, मोलगी केंदाचे केंद्रप्रमुख विलास तडवी,महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी कौतुक केले आहे. तसेच विविध स्तरातून अभिनंदन चा वर्षाव केला जात आहे.