काथर्दे खुर्द जि.प. शाळेस प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्री निलेश लोहकरे यांची आकस्मिक भेट.
काथर्दे खुर्द जि.प. शाळेस प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्री निलेश लोहकरे यांची आकस्मिक भेट.
नंदुरबार दि. १२ ( प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील काथर्दे खुर्द जि.प. शाळेला नंदुरबार जिल्ह्याचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्री. निलेश लोहकरे साहेब यांनी आकस्मिक भेट दिली असता शाळेमार्फत पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणाची अभ्यासाची गोडी लागावी याबद्दल अनमोल असा संदेश दिला. सर्व शाळा परिसर पाहून शेवटी शाळा कार्यालयामध्ये सूचना केल्या. सर्व शिक्षकांनी एकोप्याने केलेल्या कामाचे तसेच स्वतःहून शाळेसाठी मदत करणारे, शाळेला विविध उपक्रमशील शिक्षक तुकाराम अलट यांचे अभिनंदन केले. सर्वांना शुभेच्छा देत असताना आपण आपल्या स्वतःच्या मुलासाठी जे अपेक्षित करतो ते जर आपण या ठिकाणी शाळेमध्ये देत आहात हे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. शाळेतील मुख्याध्यापक श्री.भरत पावरा, शिक्षक तुकाराम अलट तालुकाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना शहादा, श्रीकांत वसईकर, खेमा वसावे सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळेबद्दल शालेय स्वच्छता, उपस्थिती याविषयी समाधान व्यक्त केले. तसेच पायाभूत चाचणी पेपर विषयी मार्गदर्शन केले, आनंददायी शनिवार राबविणे तसेच अहवाल लेखन या विषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.