मुख्याध्यापक गुलाब चौधरी जि.प.शाळा उमरी यांना TEACHER OF THE WEEK ने सन्मानित.
मुख्याध्यापक गुलाब चौधरी जि.प.शाळा उमरी यांना TEACHER OF THE WEEK ने सन्मानित.
नंदुरबार दि.१३(प्रतिनिधी) तळोदा तालुक्यातील गुलाब झेतरू चौधरी (मुख्याध्यापक) जि.प.शाळा उमरी केंद्र- तळवे आपण स्वखर्चाने जि.प. शाळा उमरीचा कायापालट केला. विद्यार्थी उपस्थिती 100% असते. आपण शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवतात. शिक्षण विभाग, पंचायत समिती तळोदा मार्फत मुख्याध्यापक गुलाब चौधरी सर यांना TEACHER OF THE WEEK घोषित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेला सेवाभावी दृष्टीकोनाबददल हार्दीक अभिनंदन पत्र देण्यात आले आहे. शेखर धनगर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तळोदा, वसंत जाधव शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती तळोदा यांनी अभिनंदन केले आहे. शाळेतील माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघाचे मदत झाली आहे. ग्रामीण भागात शाळेत विविध उपक्रम, आणि सामाजिक विविध उपक्रम राबविले तसेच मुलांची उपस्थिती वाढीसाठी व गुणवत्ता वाढीसाठी विविध शालेय व सहशालेय उपक्रम राबविले आहे. गुलाब चौधरी सर यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी कौतुक केले आहे. तसेच विविध स्तरातून अभिनंदन चा वर्षाव केला जात आहे.