जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीम. वंदना वळवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांची जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात बैठक संपन्न
जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीम. वंदना वळवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांची जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात बैठक संपन्न
नंदुरबार दि.२२ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद नंदुरबार येथे प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीचा धोरणाबाबत चर्चा करणेसाठी जिल्हाअंतर्गत बदली प्रश्न सोडविणेबाबत संघटनेचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाअंतर्गत बदली धोरणाबाबत चर्चा करण्याकरिता सर्व शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष/जिल्हा सचिव यांचेसह मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नंदुरबार यांचे दालनात दि.२२/०७/२०२४ रोजी सायं ५.३० वाजता मीटिंग माननीय श्रीमती वंदना वळवी शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनस पठाण, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, शिक्षण विभागातील अधिकारी सुभाष मारणर, सतीश गावित, यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शाखा – नंदुरबार च्या वतीने निवेनाद्वारे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. आपल्या जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शिक्षकाची बदलीची निकष पाहता विनंती बदल्या होणे अत्यंत गरजेचे आहे. नुकतेच ग्राम विकास विभाग यांच्या दि.१७ मे २०२४ रोजीच्या पत्रात याबाबत पुन्हा सूचित केलेले आहे. जिल्ह्यातील विनंती बदली प्रक्रिया राबविताना अवघड क्षेत्रातील शिक्षक हाच केंद्रबिंदू असावा. कारण गेल्या अनेक वर्षांपासून तेथें कार्यरत असणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींना बदलीची संधी मिळत नसल्यामुळे त्यांच्यात अन्यायाची भावना पसरलेली आहे. तरी त्वरित अशा शिक्षकांची अवघड क्षेत्रातील शाळेवर रुजू तारीख गृहीत धरून अवघड मधील सलग सेवेनुसार सेवाजेष्ठला यादी तयार करावी. सुगम क्षेत्रातील अनेक शिक्षक स्वेच्छेने अवघड क्षेत्रात बदलीने जायला तयार आहेत मात्र त्यांना संधी दिली जात नाही. कारण त्यांची सुगम क्षेत्रातील सलग सेवा कमी असल्याने बदली धोरणात तशी सोय नाही. जिल्ह्यातील विनंती बदली प्रक्रिया राबविताना सर्वप्रथम स्वेच्छेने अवघड क्षेत्रात बदलीने जायला तयार असणाऱ्या शिक्षकांनी अर्ज करणेविषयी प्रशासनाने पत्र काढावे. त्यांची संख्या निश्चित करावी. त्यांच्या रिक्त होणाऱ्या शाळा व सद्द्या सुगम क्षेत्रात रिक्त असलेल्या शाळा अशी सुगम मधील शाळांची एकत्रित रिक्त पोजिशन प्राप्त झाल्यावर अवघड क्षेत्रातील शिक्षकांना सेवाजेष्ठतेने बदलीची संधी द्यावी. अशाप्रकारे सुगम क्षेत्रातील सर्व रिक्त जागा अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदलीनेच भराव्यात. यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि.१५ जुलै २०२४ च्या पत्रानुसार कंत्राटी पद्धतीने येणाऱ्या नवीन सर्व शिक्षकांना अवघड क्षेत्रात पदस्थापना यावी. यानुसार प्रक्रिया राबविल्यास विनंती बदलीने अवघड क्षेत्रातून येणारे व सुगम क्षेत्रातून स्वेच्छेने जाणारे अशा दोन्ही पात्र शिक्षकांना न्याय मिळणार आहे. जिल्ह्यात विनंती बदली प्रक्रिया राबविणे अत्यंत आवश्यक आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र गैरमार्गाने काढून शासनाची आर्थिक फसवणूक करत असलेले शिक्षक बांधव यांची जे.जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद सीईओ श्री. सावनकुमार साहेब यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांनी दिली. कोणत्याही शिक्षक बांधवावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असेही सांगितले. बदली प्रक्रिया राबविताना वाडी ,वस्ती पाड्यातील दुर्गम भागातील शिक्षकांना न्याय देण्यात यावा अशी विनंती मध्यवर्ती शिक्षक समन्वय संघटनेच्या निवेदनच्या माध्यमातून करण्यात आली आहे.