जामनेर –
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब,शिवसेना नेते माजी मंत्री श्री सुभाष देसाई साहेब,शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत,विधान परिषद विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे,श्री सुनिल प्रभू, शिवसेना अंबरनाथ संपर्क प्रमुख श्री मनोज नारायण वारंग इत्यादी शिवसेना नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत
मातोश्री मुंबई येथे शिवबंधन बांधुन पारधी समाजाच्या राजकीय सामाजिक विकासासाठी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके ,अरविंद मंडलिक साहेब उल्हास नगर संपर्क प्रमुख व हजारो पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी उद्धव साहेबांनी आश्वासन दिले कि गेल्या ७५ वर्षांपासून पारधी समाजाला कोणीही प्रतिनिधित्व दिले नाही व पारधी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे येत्या काळात शिवसेना पक्षाच्या वतीने पारधी समाजाला योग्य सन्मान देऊन न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले.