आर्थिक

सातपुडा अतिदुर्गम भागातील डुंगलीपाडा (त्रिशुल) नवीन शाळेचे उद्घाटन जि. प. सीईओ सावनकुमार यांच्या हस्ते संपन्न  

सातपुडा अतिदुर्गम भागातील डुंगलीपाडा (त्रिशुल) नवीन शाळेचे उद्घाटन जि. प. सीईओ सावनकुमार यांच्या हस्ते संपन्न

नंदुरबार दि.२५( प्रतिनिधी) धडगाव तालुक्यातील सातपुडा ते दुर्गम भागातील डुंगलीपाडा त्रिशूल येथे नवीन शाळा उद्घाटन सोहळा श्री.सावनकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार, श्री. गणेशदादा पराडके सभापती (शिक्षण व अर्थ) जिल्हा परिषद, नंदुरबार, धडगाव पंचायत समिती, यांच्या शुभहस्ते फीत कापून नवीन शाळेचे उद्घाटन करण्यात आले. हे सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रम श्री.सावनकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शाळेत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन दप्तर, बिस्किटे,वह्या व चाॅकलेट चे वाटप श्री. सावनकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. श्री.सुरजदादा पाडवी सरपंच त्रिशुल यांनी आपल्या मनोगतात अतिशय दुर्गम भागात श्री गणेशदादा पराडके यांच्या प्रयत्नातून आम्हाला नवीन शाळा मंजूर करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

श्री.गणेशदादा पराडके सभापती शिक्षण व अर्थ जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी आपल्या मनोगतात सीईओ श्री सावनकुमार ज्यांनी सांगितले की शाळेला आपणास हवी ती मदत वेळेवर मिळेल. सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थी शिकून मोठे व्हावे. व आपल्या गावाचे नाव उज्वल करावे. व पालकांनी आपल्या मुलांना शाळेत रोज पाठवावे.प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व कसे आहे.सदर कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थींना पटवून सांगितले.सदर कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात सीईओ श्री.सावनकुमार यांनी सांगितले की, सातपुडा पर्वतरांगेतील अतिदुर्गम भागातील गावात भेट देण्यासाठी येतांना गावात आल्याचा खुपच आनंद झाला. शाळेची नवीन इमारत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमात श्री.लालुसिंग पावरा साहेब गटविकास अधिकारी, पंचायत समिती,धडगाव श्री. दिलिपदादा पाडवी पंचायत समिती सदस्य,धडगाव श्री.डी.डी.राजपूत साहेब गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, धडगाव, श्री.आर.बी.माळी बीट विस्तार अधिकारी,राजबर्डी, श्री.दिनेश तडवी केंद्रप्रमुख, शिंदवाणी श्री. डी.एस.पाटील,ग्रामसेवक, त्रिशुल, श्री.सुरजदादा पाडवी सरपंच, ग्रामपंचायत त्रिशुल, शाळेचे मुख्याध्यापक श्री.रतिलाल पावरा व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. नमादादा वळवी, श्री.मानकर दादा वळवी, श्री. ईश्वर‌ वसावे , सदस्य, तसेच ग्रामपंचायत त्रिशुल सदस्यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अशोक खैरनार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. प्रविण शिंदे सरांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}