शालेय सप्ताह अंतर्गत हरणमाळ जि. प. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
- शालेय सप्ताह अंतर्गत हरणमाळ जि. प. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
नंदुरबार दि.२७ (प्रतिनिधी) नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणमाळ शाळेत दि. २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीमध्ये , शिक्षण सप्ताह कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. सदर शिक्षण सप्ताह हा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, तसेच पालक यांच्यांमध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार असल्याचे मत मुख्याध्यापिका छोटीबाई पाटील यांनी व्यक्त करण्यात आलेले आहे. याबाबत सर्व प्राथमिक यांच्याप्रति राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने शाळेत अध्ययन अध्यापक साहित्य दिवस, मुलभुत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रिडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस, शेती विषयक पूरक मार्गदर्शन, वृक्षारोपण, समुदाय सहभाग दिवस वरील प्रमाणे शालेय सप्ताह कार्यक्रम आयोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेले आहे. शिक्षण सप्ताह अंतर्गत कृतीशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ चार भिंतीच्या आतील शिक्षण न मिळता बाहेरच्या जगातील शिक्षण मिळून कौशल्य प्राप्त होत आहे. या उपक्रमातील कौशल्य शिवाय विद्यार्थी स्वावलंबी होऊ शकत असल्याने शाळांमध्ये अत्यंत प्रभावीपणे हे उपक्रम राबविले जात आहे. असे मत शिक्षक गोपाल गावित यांनी व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक विकास घडवून आणणे. खेळांमधून एकता, सहकार्य आणि शिस्त या गुणांची जोपासना करणे. विद्यार्थ्यांमध्ये स्वस्थ वातावरण निर्माण करणे. पारंपरिक खेळांबद्दल जागरुकता निर्माण करणे. खेळ सापशिडी, फुगडी, धावणे, दोरी उड्या, आंधळी कोशिंबीर, लिंबू चमचा आनंददायी उपक्रम घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहात सहभाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. विशेषतः पारंपरिक खेळांनी त्यांना खूप आकर्षित केले. शिक्षकांचे योगदान या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपले भरपूर योगदान दिले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. नवापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री. रमेश चौरे, श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महेंद्र नाईक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शिक्षण सप्ताह प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्याध्यापिका छोटीबाई पाटील, शिक्षक गोपाल गावीत यांनी परिश्रम केले आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती चंद्रकला गावित, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावित, जितेंद्र गावित, अजित गावित, रंजीत गावित, रविदास गावित, कार्तिका गावित, अनु गावित, वाड्या गावित, सुदाम गावित यांचे सहकार्य लाभले आहेत.