आमदार राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते आदर्श शिक्षक ओमशेखर काला यांचा सत्कार
नंदुरबार दि. २८ (प्रतिनिधी) शहादा -तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री राजेशदादा पाडवी साहेब यांच्या हस्ते दैनिक लोकमत गौरव पुरस्कार आदर्श शिक्षक श्री ओमशेखर काला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचोराबारी ता. जि. नंदुरबार. यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. गोपाल गावित, श्री. सतीश पाटील सर अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ, श्री. निदेश वळवी सर, श्री. उल्हास लांडगे सर, श्री.अमृत पाटील, श्री. पंकज भदाणे सर, श्री.अनिल माळी सर, श्री .दयानंद जाधव सर. श्री नितीन पाटील सर, श्री प्रदीप पाटील सर. आदी पदाधिकारी उपस्थित होते.