श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद सागाळी जि. प. शाळेत संपन्न
श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद सागाळी जि. प. शाळेत संपन्न
नंदुरबार दि.३०(प्रतिनिधी) नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सागाळी व जि.प. शाळा नवापाडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद सागाळी येथे उत्साहात संपन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य श्री. महाले, शिक्षण विस्तार अधिकारी शिलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख महेंद्र नाईक, केंद्रीय मुख्याध्यापक भटू बंजारा, महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, सागाळी गावाचे सरपंच संजय कोकणी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कोकणी, उपाध्यक्ष योगिता कोकणी, नवापाडा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आकाश कोकणी, सदस्य रूपसिंग वळवी, सोन्या कोकणी, ग्यानप्रकाश फाउंडेशन जिल्हा समन्वयक श्रीमती क्रांती सोनवणे, मधुकर कांबळे सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. सागाळी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कांतीलाल कोकणी यांचा सत्कार श्रावणी केंद्रातर्फे गिफ्ट, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात आला. दिनेश पाडवी यांचे चिरंजीव डॉ. ललितकुमार एम.बी.बी.एस उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार केंद्रातर्फे शाल, श्रीफळ, देऊन करण्यात आला. श्रावणी केंद्रात आलेले नवीन शिक्षक सुरेश कोकणी, श्रीमती जागृती वसावे मॅडम केंद्रमार्फत सत्कार करण्यात आला. नाविन्यपूर्ण अशी शिक्षण परिषद पाहता अनुभवता आली. ह्या परिषदेचा परिणाम शिक्षकांवर तर झालाच शिवाय त्याचा उपयोग त्यांच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर झाला. शिक्षक हे सामाजिक क्रांतीचा अग्रदूत आहे ह्यावर मनशक्ती केंद्राचा विश्वास आहे. ह्या शिक्षण परिषदेचा अनुभव आणि वैचारिक सिद्धांतांचा फायदा सगळ्यांनाच व्हावा. अध्ययन परिपक्वतेवर अवलंबून आहे. परिपक्वता म्हणजे शरीराच्या अवयवात व गुणात नैसर्गिकरित्या परिपूर्णता येणे म्हणजे परिपक्वता होय. परीपाक्वतेशिवाय अध्ययन होत नाही म्हणून अध्ययन हे परीक्वतेवर अवलंबून आहे. असेही मत शिक्षण विस्तार अधिकारी शिलवंत वाकोडे यांनी मार्गदर्शन केले. केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मागोवा, मागील शैक्षणिक वर्षातील शिक्षण परिषदांची निवडक क्षणचित्रे केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनी माहिती दिली. नियतकालिक मूल्यमापन चाचणी बाबत, जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पिपिटीच्या आधारे मार्गदर्शन आणि शंका निरसन बकाराम सुर्यवंशी सरांनी माहिती दिली. रूटीन चाचणी कार्यक्रम जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पिपिटी च्या आधारे मार्गदर्शन आणि शंका निरसन धिरज खैरनार सरांनी माहिती दिली. विद्याप्रवेश कार्यक्रम जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पिपीटीच्या आधारे मार्गदर्शन आणि निवडक दोन कृतींचे सादरीकरनाची अरुणा कोकणी मॅडम यांनी माहिती दिली. केंद्र संसाधन गट व शाळा व्यवस्थापन समिती स्थापना व पुनर्गठन जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटी च्या आधारे मार्गदर्शन आणि शंका निरसन. केंद्र संसाधन गट स्थापन करणे अथवा पुनर्गठन करून यादी फोटोसह शिक्षण परिषद प्रतिसाद लिंकमध्ये अपलोड करणे. शकुंतला गावित मॅडम यांनी माहिती दिली. आनंदी शनिवार उपक्रम दिलेल्या शासन निर्णयाचे वाचन करून शासन निर्णयातील महत्वपूर्ण बाबींचे अवलोकन करणे. सदर निर्णयाची अंमलबजावणी करणेसंदर्भात चर्चा करून नियोजन करणे. केशव पवार सरांनी माहिती दिली. ग्यानप्रकाश फाउंडेशन जिल्हा समन्वयक क्रांती सोनवणे यांनी सांगितले की, गुणवत्ता पूर्ण शिक्षण परिषद कशी असावी ? यामध्ये केंद्र संसाधन गटाची नेमकी भूमिका? शाळा व्यवस्थापन समिती मासिक बैठक पुनर्गठन याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले. प्रशासकीय सूचना केंद्राच्या गरजानुरूप प्रशासकीय सूचना केंद्रप्रमुख शिक्षण परिषद लिंकबाबत उपस्थितानी लिंक भरणे.