ग्रामीण

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण द्यावे, शिक्षक हा समाजाचा आरसा आहे. – वंदना वळवी प्राथमिक शिक्षणाधिकारी

  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण द्यावे, शिक्षक हा समाजाचा आरसा आहे. – वंदना वळवी प्राथमिक शिक्षणाधिकारी

नंदुरबार दि. ३१ ( प्रतिनिधी ) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या नियोजनानुसार अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद केंद्रशाळा मोलगी येथे संपन्न झाली. नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, याहा मोगी मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी अक्कलकुवा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत नरवडे, मोलगी बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी, केंद्रप्रमुख विलास तडवी, मुख्याध्यापक चव्हाण सर व मोलगी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. शिक्षक हा समाजाचा आरसा आहे, शिक्षण देतांना ते विद्यार्थी नव्हे तर देशाचे सक्षम नागरिक घडविण्याचे काम करत असतात. प्रत्येक शिक्षकाने तंत्रस्नेही व्हावे, म्हणून शासन तंत्रज्ञानाच्या अधिक सेवा सवलती उपलब्ध करून देत आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे आम्ही शिक्षण देऊ, पण खरे शिक्षण देण्याचे काम शिक्षकांचे आहे. उपक्रमातून गट पद्धतीने, ज्ञानरचनावाद या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हा उपक्रम आहे. ग्रामीण भागातील १०० टक्के मुले शिकली पाहिजेत. एकही विद्यार्थी शैक्षणिक अप्रगत राहणार नाही, यासाठी शिक्षकांचे योगदानही महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्याबरोबरच शिक्षकाला सुखी करण्याचा, प्रगत शिक्षणाचा आनंददायी शनिवार हा उपक्रम आहे. शिक्षक सुखी झाल्यावरच तो विद्यार्थ्याला आनंदाने शैक्षणिक सुख देऊ शकणार आहे. सर्व मुले शिकली पाहिजेत, त्यासाठी शिक्षकांनी सर्वस्व पणाला लावावे आणि म्हणूनच आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाने शिक्षकांना मोकळीक दिली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील एकही विद्यार्थी अप्रगत शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही, तर यास शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी केले आहे. मोलगी बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले प्रशासकीय सूचना दिल्या. गटशिक्षणाधिकारी प्रशांत नरवडे यांनी मार्गदर्शन केले. आणि प्रशासकीय सूचना दिल्या. जि. प. शाळा माट्याबारीपाडा शाळेचे उपशिक्षक अरविंद गावित यांना अविष्कार फाउंडेशन इंडिया कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषदेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या मार्फत नियोजित तासिका घेण्यात आल्या. शिक्षण परिषद मागोवा मागिल शैक्षणिक वर्षातील शिक्षण परिषदांचे निवडक क्षणचित्रे याविषयी केंद्रप्रमुख विलास तडवी यांनी मार्गदर्शन केले. नियतकलिक मुल्यांकन चाचणी बाबत माहिती अलका पाटील यांनी दिली. अरविंद गावीत यांनी रुटीन चाचणी कार्यक्रम बाबत माहिती दिली. विद्या प्रवेश कार्यक्रम बाबत प्रविण मासुळे यांनी मार्गदर्शन केले. केंद्र संसाधन गट व शाळा व्यवस्थापन समिती स्थापन व पुनर्गठन बाबतीत सखोल अशी माहिती राहुल साळुंखे सरांनी दिली. आनंददायी शनिवार उपक्रमाबाबत मालपुरे सर यांनी माहिती दिली. केंद्रातील गरजेनुसार विषय या सत्राची जबाबदारी केंद्रप्रमुख विलास तडवी, जात्र्या वसावे यांनी सहकार्य लाभले. शिक्षण परिषदचे सुत्रसंचलन अश्विनी पाटील, प्रविण मासुळे यांनी केले. आभार प्रदर्शन रोहिदास पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}