निंबीपाडा मो. जि.प.शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण
निंबीपाडा मो. जि.प.शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण
अक्कलकुवा: मोलगी: दि.१
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असून आणि तो मी मिळविणारच अशी सिंह गर्जना करणारे स्वातंत्र्य लढ्यातील थोर विचारवंत लोकमान्य टिळक यांची आज १०४ वी पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्ताने अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा केंद्रात असलेल्या जि.प.शाळा निंबीपाडा(मो.) शाळेत थोर विचारवंत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
आज झालेल्या कार्यक्रमात शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माकता वसावे, मुख्याध्यापक मगन पाडवी आणि पालक यांची प्रमुख उपस्थिती होती. झालेल्या कार्यक्रमात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांचे विचार शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात आले. थोर व्यक्तींचे विचार मांडतांना शाळेतील विद्यार्थ्यांचा यात मोठा सहभाग दिसून आला. यात मोनिका वसावे,नेहा वसावे,रोशनी वसावे आणि हर्षना तडवी या मुलींनी सहभाग नोंदवितांना भाषणे सादर केली. सरदारसिंग वळवी सर, नितेश वळवी सर, गोविंदसिंग पाडवी सर, संजय वसावे सर व मुख्याध्यापक मगन पाडवी सर यांनी थोर विचारवंतानी केलेले समर्पण व त्यांचे विचार आपल्या जिवनात किती कामी येतात याचे विवीध उदाहरणांसह माहिती दिली.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त शाळेत परसबाग तयार करण्यात आली व शालेय परिसरात पालक व विद्यार्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात सुत्रसंचलन गणेश पावरा सर व समारोप आयमनसिंग नाईक सर यांनी केले