मोफत पुरुष नसबंदी ऑपरेशन शिबीर.
*मोफत पुरुष नसबंदी ऑपरेशन शिबीर.*
विशेष आरोग्य जनजागरण मोहिमेंतर्गत आरोग्य विभाग जामनेर यांच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भाईकर व जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे मंगळवार दि.१३/०८/२४ रोजी तालुकास्तरीय पुरुष नसबंदी शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी,ज्या व्यक्तींना नसबंदी करायची असेल किंवा आपल्या परिचयाच्या व्यक्तीस नसबंदी करायची असल्यास श्री.दिनकर माळी मोबाईल क्रमांक 9420558073,श्री. रविंद्र सुर्यवंशी मोबाईल क्रमांक 9359787959 यांच्याशी संपर्क साधावा,यासाठी कोण्याही प्रकारे भरती होण्याची आवश्यकता नाही,ऑपरेशन नंतर दहा मिनिटात पेशंट घरी जाऊ शकतो.विशेष म्हणजे माणसाच्या पुरुषत्वावर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले आहे.