जामनेर –मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला संपूर्ण राज्यात उदंड प्रतिसाद मिळत आहे. सर्व महिलांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी लोहारा, ता. पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणी शिबिराचा शुभारंभ नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते करण्यात आला . जास्तीत जास्त महिलांनी या योजनेत सहभागी होत महिला सबलीकरणाच्या या ऐतिहासिक क्रांतीला पाठबळ द्यावे असे आवाहन यावेळी केले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.