सप्तशृंगी गडावर वास्तव्य करत असलेल्या पारधी समाज बांधवांची आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांनी घेतली भेट
*सप्तशृंगी गडावर वास्तव्य करत असलेल्या पारधी समाज बांधवांना चार पाच दिवसांपूर्वी गडावरील ग्रामपंचायत सदस्य यांच्या कडून मारहाण झाली होती पोलिस प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नव्हते व गुन्हा ही दाखल करायला तयार नव्हते या घटनेची माहिती आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांना मिळाली व आज दि .१३ ऑगस्ट २०२४ रोजी मुकेश भाऊ यांनी संबंधित पोलिस स्टेशनला भेट दिली व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली व पिडीत पारधी कुटुंबांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना आधार दिला व भविष्य काळात कधी ही पारधी समाज बांधवांवर अन्याय झाला तर आदिवासी पारधी क्रांती संघटना समाज बांधवांच्या मदतीसाठी धावून येईल असे पारधी कुटुंबांना आश्वासीत केले अशा घटना पारधी समाज बांधवांवर वारंवार महाराष्ट्रभर होत या सर्व घटनेला कोणी जर जबाबदार असेल तर आपण सर्व पारधी समाज बांधव आहोत कारण आपला पारधी समाज जो पर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही म्हणून सर्व पारधी समाज बांधवांनी एकजूट होऊन पारधी समाजाचे अस्तित्व तयार करावे लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने भविष्यात आपलेला न्याय मिळेल अन्यथा आपल्या समाजावर मोठ्या प्रमाणात वाढत जाईल,या प्रसंगी उपस्थित श्री समाधान भाऊ साळुंके, शामकांत चव्हाण सर मालेगाव तालुका अध्यक्ष, श्री रमेश पवार नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी पारधी समाज बांधव उपस्थित होते*