हरणमाळ जि. प. शाळेत ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण.

- हरणमाळ जि. प. शाळेत ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण.
नंदुरबार दि.१५ (प्रतिनिधी) नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणमाळ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची सुरुवात गावातून प्रभातफेरी काढून करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावित यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकला गावित, अंगणवाडी सेविका भिलकीबाई गावित, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजित गावित, जितेंद्र गावित, रोहिदास गावित, रजनी गावित, दिलीप गावित, हूपड्या गावित, आदी माता, पालक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून शाळेचा विकास कसा होईल, ग्रामपंचायत निधीतून शाळेला भौतिक सुविधा आवश्यक असेल त्या बाबींवर लक्ष देऊन निधी देण्याचे आश्वासन दिले. शालेय उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता संदर्भात आयोजित सभेत ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावित यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांनी बलिदान देऊन आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी दिलेले योगदान, संघर्षांबद्दल माहिती, त्यांच्या पूर्वजांना आलेल्या कष्टांचे प्रतिबिंबित केले. इंग्रजांनी भारतीयांचे हक्क कसे हिरावून घेतले आणि त्यांना अन्यायकारक परिस्थितीत जगण्यास भाग पाडले. ब्रिटीश राजवटीत मोठ्या प्रमाणात दारिद्र्यामुळे भारतीयांना अन्न आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे, ज्यामुळे शिक्षण आणि आरोग्यसेवा दूरची प्राथमिकता आहे. शिक्षणातील असमानता अधोरेखित केली, हे लक्षात घेतले की विशेषाधिकारप्राप्त व्यक्तींना चांगले शालेय शिक्षण मिळाले, तर सामान्य भारतीयांना सविनय कायदेभंग आणि भारत छोडो यासारख्या चळवळींद्वारे सुधारित प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला. असंही मत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी सांगितले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि वेगाने विकसित होणारा देश बनला आहे, मुख्यत्वे शिक्षणातील प्रगतीमुळे. ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणाच्या अधिकाराचे महत्त्व, विद्यार्थ्यांनी अधिक संकरित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत शैक्षणिक प्रणालीसह विकसित भारताची कल्पना केली. पालक विद्यार्थी यांनी निपुण भारत प्रतिज्ञा घेतली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका छोटीबाई पाटील यांनी सांगितले. माता- पालक यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला.



