ग्रामीण

नंदुरबार जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते संपन्न

नंदुरबार जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते संपन्न

 

प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावीत, वित्त व शिक्षण समितीचे सभापती गणेश पराडके, बांधकाम व आरोग्य समिती सभापती हेमलता शितोळे, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गावीत, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्याभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा समिती मार्फत पडताळणी करुन खालीलप्रमाणे शिक्षकांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाळेचे नाव गुणानुक्रम नंदुरबार श्री. मनोजकुमार पोपट चौधरी जि.प. शाळा, शेजवे, प्रथम नवापूर श्रीम, सरिता जालमसिंग वळवी जि.प.शाळा, सोनारे दिगर, प्रथम शहादा श्रीम. लक्ष्मी भगवानराव रुपदे जि.प.शाळा, शिरुड दिगर, प्रथम तळोदा श्री. पाटील दिलीप भास्कर जि.प.शाळा, पुनर्वसन क्र. ७ त-हावद, प्रथम अक्कलकुवा श्रीम. आशाबेन दिलीप पटेल जि.प.शाळा, ब्राम्हणगांव, प्रथम धडगाव श्री. शिंदे रविंद्र रामदास जि.प.शाळा, तोरणमाळ प्रथम, शहादा श्री. चेतन मधुकर शिंदे जि.प.शाळा, कलमाडी त.बो. विशेष उत्तेजनार्थ,धडगांव, श्री. अविनाश गावीत जि.प.शाळा, कात्री विशेष उत्तेजनार्थ यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या टप्पा क्रमांक-१ मधील गुणानुक्रम मिळविलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-१ पुरस्कार सन २०२३” गुणानुक्रम वितरीत रक्कम जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळा, नंदुरबार जि.प.शाळा पाचोराबारी प्रथम रु.११ लक्ष, नवापूर जि.प.शाळा, बोरवण, द्वितीय रु.५ लक्ष, धडगांव आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, तोरणमाळ तृतीय रु.३ लक्ष, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा नंदुरबार डॉ. काणे गल्स हायस्कुल, नंदुरबार प्रथम रु.११ लक्ष, तळोदा गो.हू. महाजन हायस्कूल, तळोदा द्वितीय रु.५ लक्ष, अक्कलकुवा एस.जे.एम. एस. हायस्कुल, कोराई तृतीय रु.३ लक्ष

तसेच आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ येथील विद्यार्थी मिलेश सुंगाली पावरा याची जपान येथील टोकीयो येथे संपन्न झालेल्या साकोरा सायन्स लॅब येथील उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून निवड झाली असल्याने व सदर विद्यार्थ्यांने तेथे जाऊन यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले असल्याने त्याचा देखील सत्कार करण्यात आला. शिक्षण विभागात सरळ सेवेने नव्याने रुजू झालेले विस्तार अधिकारी रमेश गिरी यांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी केले. यावेळी सत्कारार्थी शिक्षकांच्या वतीने मनोज चौधरी, तसेच जि. प शिक्षण सभापती गणेश पराडके यांनी मनोगतातून जिल्ह्यातील वाडी, वस्ती, पाड्यावरील शिक्षकांनी विद्यार्थी सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तासाठी प्रयत्न करावा. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत मत व्यक्त केले. आभार प्रदर्शन योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, भावेश सोनवणे, मयुर वाणी, भरत पाटील, आसिफ पठाण, योगेश रघुवंशी, इसरार सैय्यद, स्वप्निल पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी- शिक्षण, केंद्रप्रमुख तसेच शिक्षक संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}