रमेश चौधरी यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान
*रमेश चौधरी यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान*
रमेश गोकुळ चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे (रा.भाटपुरा ता.शिरपूर) यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मार्फत शिक्षणशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी नोटिफिकेशन *कुलगुरू प्रो.व्ही. एल.माहेश्वरी* यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
डॉ. रमेश चौधरी यांनी”अ स्टडी ऑफ टीचर्स एटीट्यूड टूवर्ड्स युजिंग न्यू टेक्नॉलॉजी अँड युजिंग सायबर रिसोर्सेस विथ स्पेशल रेफरन्स टू डिजिटल स्कूल.” या विषयावर संशोधन केले असून *डॉ. राहुल गोपीचंद सनेर*,सहाय्यक प्राध्यापक श्रीमती एच. आर.पटेल महिला कला महाविद्यालय शिरपूर यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.रमेश चौधरी हे जिल्हा परिषद सेवा कालावधीत प्राथमिक शिक्षक म्हणून धडगाव अक्कलकुवा ,शहादा तालुक्यात कार्य करीत असताना नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग एक पदावर नियुक्त झाले आहेत. डॉ.चौधरी हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे सहा वर्ष सेवेनंतर सध्या धुळे येथे वरिष्ठ अधिव्याख्याता पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एस.टी. भूकन ,सिनेट सदस्य डॉ.गजानन पाटील , धुळे डायट प्राचार्य डॉ.मंजुषा क्षीरसागर ,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.जयप्रकाश पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.