आर्थिक
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्राम स्वराजचे कर्मचारी दोन महिन्या च्या पगारा पासुन वंचित करीत आहे पगाराची प्रतीक्षा
- जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्राम स्वराजचे कर्मचारी दोन महिन्या च्या पगारा पासुन वंचित करीत आहे पगाराची प्रतीक्षा
जळगाव – राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ग्रामपंचयती च्या विकासाचा श्वास आहे. मात्र या अभियानातील राज्य भरातील पाचशेंच्या वर कर्मचाऱ्यांचे पगार दोन महिन्या पासून थकले आहे . या विषयी कुठलेही ठोस उत्तर मंत्रालयीन पातळी वरून मिळत नसल्याचे सांगण्यात येते. जळगाव जिल्ह्यातील काही कर्मचारी यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातील कर्मचारी काम करता. ग्रामविकासाचे आराखडे
तयार करणे, सरपंच उप सरपंच व सदस्या करीता प्रशिक्षणाचे आयोजन करणे या सह इतर ही महत्त्व पूर्ण कामे या अभियानातील कर्मचारी करतात. परंतू दोन महिन्या चा पगार थकीत आहे. शासनाने कुठलीही पूर्व सूचना न देता परस्पर पीएफ कंपनी बदल्याने या कर्माऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. आता पगार थकीत असल्या मुळे आणखी त्यात भर पडली..