शिवशक्ती व आझाद मित्र मंडळ शास्त्रीनगर जामनेर यांच्या मार्फत गणेश उत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन.
जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसं सर्व कार्यकर्ते सगळं जग, सगळं घरदार सोडून, घरच्यांचे जोडे खाऊन सुध्दा फक्त आणि फक्त गणेशोत्सवाकडेच लक्ष देत असतात. अंगात संचारल्यासारखं कार्यकर्ते काम करत असतात.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसात खरंच खूप मोठी ताकद आहे. कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते घ्या, त्यांची तळमळ ही वेगळीच असते. माझं मंडळ उत्कृष्ट कसं होईल याकडेच त्यांचं सगळं लक्ष असतं. गणपतीचे कार्यकर्ते हे खरंच वेगळेच असतात. जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसं सर्व कार्यकर्ते सगळं जग, सगळं घरदार सोडून, घरच्यांचे जोडे खाऊन सुध्दा फक्त आणि फक्त गणेशोत्सवाकडेच लक्ष देत असतात. अंगात संचारल्यासारखं कार्यकर्ते काम करत असतात. गणेशोत्सवामध्ये घड्याळात न पाहता रात्रंदिवस कार्यकर्ते काम करतात आणि त्याच्यामागे कुठला वैयक्तिक स्वार्थ नसतो त्यांचा, हे महत्त्वाचं. मग ते कुठल्याही मंडळाचे का असेना, ही
ताकद फक्त तो बाप्पाच देऊ शकतो.
अशाच प्रकारे शास्त्रीनगर भागातील आझाद मित्र मंडळाने विविध स्पर्धांचे आयोजन करुण मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आपले पाऊल उचलून गणेशोत्सव साजरा करीत आहे.