विरोधक सध्या हतबल , घोडा मैदान जवळ आपली ताकत दाखवा –ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन , जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथील प्रकाराबाबत प्रतिक्रिया
विरोधक सध्या हतबल , घोडा मैदान जवळ आपली ताकत दाखवा –ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन ,
जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथील प्रकाराबाबत प्रतिक्रिया
जळगाव प्रहार -वृषभ इंगळे
जामनेर प्रतिनीधी –
जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त मी गेलो होतो , लहान गल्ली होती तेथुन मोठी गाडी जात नसल्याने मोटार सायकल वरून प्रवास केला , त्याठिकाणी पाऊस झाल्याने पाणी साचले होते , चिखल झाला होता , मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात कामे सुरू आहेत ,
एखाद ठिकाणी काम सुटले असेल तर याचा मोठा बाऊ , विपर्यास विरोधकांनी सोशल मिडीयावर केला आहे .
घोडा मैदान जवळच असुन कोणाची ताकत किती ?
ते समजेलच अशी प्रतिक्रिया नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली .
भाजपाचे पॅनल तिथे आहे , बॉडी आमची आहे , विविध विकास कामे सुरू आहेत .
जामनेर तालुका कोणाच्या बाजुने आहे , ते लोकसभेला मोठे मत्ताधिक्य आम्ही घेतले आहे .
त्यामुळे विरोधक हतबल असल्याचे त्यांनी सांगितले .
ज्याला कुणाला भाजपाचे तिकीट मिळेल त्याच्या समोर तुम्ही लढा , ताकत दाखवा असे सोशल मिडीयावर प्रकार करू नका असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.