ग्रामीण
जामनेर तालुक्यातील प्रवीण तेली ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जामनेर – वृषभ इंगळे
जामनेर तालुक्यातील प्रवीण तेली ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने नुकतेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले.आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
ग्रामसेवक हा ग्रामस्तरीय प्रशासनाचा महत्वाचा खांब असतो.शासनाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. श्री . प्रवीण तेली ग्रामसेवक यांचे जामनेर तालुक्यात उत्कृष्ट काम सुरू आहे.
श्री . प्रवीण तेली यांना मा. मंत्री गिरीश भाऊ महाजन, तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, व मदत व पनर्वसनमंत्री श्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी , विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.