श्री.शिवाजी हायस्कूल नवापूर येथे माझी ई शाळा कार्यशाळा संपन्न दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी समग्र शिक्षण महाराष्ट्र शासन आणि प्रथम इन्फोटेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यात “माझी ई शाळा” हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ३०० शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. माझी ई शाळा कार्यक्रमा अंतर्गत नवापूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश देसले तसेच केंद्रप्रमुख, प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक राकेश आगळे, तालुका प्रतिनिधि सवीन पाडवी व उपस्थित ५० शाळांचे केंद्र शाळेचे मुख्याध्यापक आणि तंत्रस्नेही शिक्षक यांच्या उपस्थितीत श्री. शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय नवापूर येथे माझी ई शाळा कार्यशाळा संपन्न झाली. शिक्षण विस्तार अधिकारी रमेश देसले यांनी शाळेतील डिजिटल संसाधने सुरू करून त्यांचा वापर नियमित करावा तसेच मिळालेल्या साहित्याचा उपयोग हा दैनंदीन शालेय शिक्षणात करावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण द्यावे असे आवाहन केले. राकेश आगळे यांनी माझी ई शाळा हा उपक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० याविषयी चर्चा केली, व डिजिटल साक्षर सॉफ्टवेअरचा याच्याशी काय संबंध येतो व आपल्या शाळेत अभ्यासक्रमात कशी मदत होते ते समजावून सांगितले. तसेच डिजिटल अभ्यासक्रमाची रचना कशी केली आहे. सध्याच्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर शालेय शिक्षणात कसा जास्तीत जास्त उपयोग करता येईल व राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या क्षमता तंत्रज्ञानाचा वापर करून कसे साध्य करू शकतो हे सादरीकरणाच्या माध्यमातुन सांगीतले तसेच श्रावणी शाळेचे मुख्याध्यापक भटू बंजारा यांनी मान्यवरांचे आभार मानले व डिजिटल शिक्षणं प्रणालीचा नियमित उपयोग करावा व कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
Related Articles
मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांचे मानधन द्या ; जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना प्रहार शिक्षक संघटनेची मागणी
October 5, 2024