उत्तर महाराष्ट्र विभाग कार्यकर्ता संवाद मेळावा, नाशिक संपन्न
उत्तर महाराष्ट्र विभाग कार्यकर्ता संवाद मेळावा, नाशिक संपन्न
नाशिक –देशाचे गृहमंत्री श्री. अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक येथे भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या व महायुतीच्या भव्य विजयासाठी लाभलेले मा.अमितभाईंचे बहुमोल मार्गदर्शन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे होते.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मेळाव्यास केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रभारी श्री. भूपेंद्रजी यादव, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री श्री. शिवप्रकाश जी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपा विधानसभा निवडणूक संयोजक श्री. रावसाहेब दानवे जी, नामदार गिरीश महाजन ,महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री श्री. विजयकुमार गावित, केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे, खासदार श्रीमती स्मिता वाघ यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.