Blog
जनकल्याणाच्या योजना सर्वा पर्यंत पोहचवा — नामदार गिरीश महाजन
जनकल्याणाच्या योजना सर्वा पर्यंत पोहचवा — नामदार गिरीश महाजन
जळगाव प्रहार वृषभ इंगळे
जामनेर –भारतीय जनता पार्टी जामनेर विधानसभा मतदारसंघाची विस्तृत बैठक आज जामनेर येथील बाबाजी राघो मंगल कार्यालय येथे पार पडली.
पक्ष तत्वांना समर्पित राहत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून विकास कार्य करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता सज्ज आहे. जनकल्याणाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कसे कार्य करता येईल, यासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी संबोधित केले.
याप्रसंगी प्रवासी प्रभारी नेता जळगाव जिल्हा तथा खासदार श्री. बंशीलालजी गुर्जर, जामनेर विधानसभा निवडणूक प्रवासी नेता आ. श्री. आशिषभाई देसाई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.