ग्रामीण
मातंग समाजाच्या विकासासाठी महायुती सरकार कार्यरत — नामदार गिरीश महाजन
मातंग समाजाच्या विकासासाठी महायुती सरकार कार्यरत — नामदार गिरीश महाजन
जळगाव प्रहार
जामनेर –सकल मातंग समाजाच्या वतीने जामनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यास नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी उपस्थित राहून सर्व समाज बांधवांसोबत संवाद साधला.
मातंग समाजाच्या विकासासाठी महायुती सरकार कार्यरत असून यासाठी मुंबईत भव्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या निर्मितीला सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी तातडीने 305 कोटी रुपयांच्या आराखड्यालाही मान्यता देण्यात आली असून लवकरच या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी धोरणात्मक कार्य घडेल हा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी आ. श्री. अमित गोरखे, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. लहुजी कसबे यांच्यासह मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.