पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने २ ते ४ ऑक्टोबर दरम्यान जळगाव येथे “ॲक्वाफेस्ट जळगाव” या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पहिल्याच ॲक्वाफेस्टचे आज नामदार गिरीश महाजन यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जळगाव — पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने २ ते ४ ऑक्टोबर दरम्यान जळगाव येथे “ॲक्वाफेस्ट जळगाव” या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पहिल्याच ॲक्वाफेस्टचे आज नामदार गिरीश महाजन यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नव्हे तर साहसी जलक्रीडा व जल पर्यटनास प्रोत्साहन देणे, जळगाव शहरातील पर्यटनाला चालना देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. याअंतर्गत जळगावातील गणेश घाट, मेहरूण तलाव, जळगाव महानगरपालिका जलतरण तलाव अशा विविध ठिकाणी साहसी अशा विविध “वॉटर स्पोर्ट्स”चे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील अनेक प्रतिभावान खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तरी, तमाम जळगावकरांनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
याप्रसंगी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आ. श्री. संजय सावकारे, आ. श्री. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.