जामनेर — मतदारसंघातील तोंडापुर व फत्तेपूर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगार बंधू भगिनींना मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे वाटप नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यास उपस्थित राहून सर्व बांधकाम कामगार बंधू भगिनींसोबत संवाद साधला. महायुती सरकार सर्व कामगारांच्या कल्याणासाठी कटिबध्द आहे हा विश्वास यावेळी व्यक्त केला.