Blog

ज्योत्सना गावित यांची भारतीय जनता पार्टी युवती नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड

ज्योत्सना गावित यांची भारतीय जनता पार्टी युवती नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड

 

नंदुरबार – सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी नेते के.टी.गावीत यांची सुकन्या ज्योत्सना कृष्णा गावीत यांची भारतीय जनता पार्टी युवती जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री विजय चौधरी यांच्या आदेशान्वये ज्योत्सना

गावित यांची युवती जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र आज भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांच्यासोबत नवापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक युवतींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.यावेळी झामट्यावड गावाचे सरपंच हर्षाली गावित, निलम वसावे, डॉ. हर्षिता वळवी, प्रियंका गावित, प्रियंका मालुसरे, अमिषा गावित, रोहित गावित व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्योत्सना गावित ह्या गेल्या १८ वर्षापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत. शहर मंत्री प्रदेश कार्यकारणी सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अंतर्गत अनेक आंदोलन त्यांच्या सक्रिय सहभाग राहिला असून २०१० साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे आयोजित विराट विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे त्यांनी जिल्ह्यामधून प्रतिनिधित्व केले असून २०११ मध्ये राज्यस्तरीय मोर्चामध्ये त्यांच्या सक्रिय सहभाग राहिला आहे. या जनसेवेच्या कार्याला बघून ज्योत्सना गावित यांची भारतीय जनता पार्टीच्या युवती जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. ज्योत्सना गावित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून मोठ्या प्रमाणात युवतीं व कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या पाठीशी उभी आहे. म्हणून नवापूर विधानसभा मतदारसंघाची जागा जर भारतीय जनता पार्टीला सुटली तर ज्योत्सना गावित यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}