Blog

हरणमाळ जि.प.शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम 

हरणमाळ जि.प.शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम

 

नंदुरबार दि.१९ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या आदेशानुसार नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणमाळ येथे मतदान जागृती आणि दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. यावेळी नवापूर तालुक्याचे शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, शाळेच्या मुख्याध्यापक छोटीबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकला गावित, हेमलता वळवी, रणजीत गावित, रजनी गावित,संदेश गावीत आदी गावातील माता पालक तसेच शाळा समिती सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती रॅलीद्वारे मतदानाचे आवाहन संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. शाळांमधून चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करून मतदानाचा संदेश देण्यात आला. शाळकरी विद्यार्थ्यांनी सुंदर कलेच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी अभिनव कल्पनेतून मतदानाचे संदेश साकारले. उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिव्यांग मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी देखील रॅलीचे आयोजन करण्यात आले. शाळेतील शिक्षकदेखील उपक्रमात उत्साहाने सहभागी होत आहेत. मतदान जनजागृती माध्यमातूनच मतदानाचा संदेश देण्यात येत आहे. या पथकाद्वारे मतदासाठी प्रशासनाने केलेल्या सुविधांची माहिती देण्याबरोबर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना ईव्हीएम यंत्राबाबत माहिती करून देण्यात येत आहे. मतदान प्रक्रीया समजून घेण्यासाठी ही प्रात्यक्षिके उपयुक्त ठरत आहेत. नागरिक आणि युवावर्ग मतदान जागृती उपक्रमात सहभाग घ्यावा आणि जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत नवापूर तालुका पुढे आणण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नवापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}