भाजपा कडून सातव्यांदा जामनेर मतदार संघातून गिरीश भाऊंना उमेदवारी
भाजपा कडून सातव्यांदा जामनेर मतदार संघातून गिरीश भाऊंना उमेदवारी
जळगाव प्रहार
जामनेर — भाजपाजनता पार्टीने सलग सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची नामदार गिरीश भाऊ महाजन यांना संधी दिली आहे . माझ्यावर हा विश्वास दाखवल्याबद्दल प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री श्री. अमितभाई शहा, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री. जे.पी. नड्डा जी, श्री. देवेंद्र फडणवीसजी, तसेच केंद्रीय निवडणूक समितीतील सर्व सन्माननीय सदस्यांचे मनापासून आभार गिरीश महाजन यांनी मानले .
पक्ष नेतृत्वाने दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवत पुन्हा एकदा जामनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेची समर्पित भावनेने सेवा करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
उमेदवारांच्या पहिल्या यादीत माझ्यासह इतरही 98 उमेदवारांचे नाव जाहीर झाले आहे. या सर्व सहकाऱ्यांचेही हार्दिक अभिनंदन व सर्वांना भव्य विजयासाठी मनापासून शुभेच्छा त्यांनी देवून यंदा रेकॉड ब्रेक मताधिक्याने माझा विजय होइल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .