ठाकरे पक्षाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांना मातोश्रीला बोलवले..
शिवसेनेने राहुल चव्हाण यांचा मागवला बायोडाटा....!
*ठाकरे पक्षाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांना मातोश्री ला आले बोलवले…*
शिवसेनेने राहुल चव्हाण यांचा मागवला बायोडाटा….!
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल अशी शक्यता असताना अचानकपणे काही पक्ष हे स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत देत आहे. त्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक व जामनेर मध्ये आक्रमक नेता म्हणुन ज्यांची ओळख आहे. असे ठाकरे गटाचे राहुल चव्हाण यांना काल रात्री उशिरा फोन आल्याने ते मुंबई येथे रवाना झाले आहे. राहुल चव्हाण हे जामनेर विधानसभेत इच्छुक उमेदवार म्हणुन मागील 5 वर्षांपासून तयारीला लागलेले आहे. जामनेर विधानसभेत पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष देखील उमेदवारी करणार म्हणुन त्यांनी जाहीर केलेलं होते.
आज तात्काळ सूत्रांच्या माहिती प्रमाणे जामनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होते की चौरंगी ही वेळेच सांगेल परंतु राहुल चव्हाणाच्या माध्यमातून एक आक्रमक व युवा चेहरा जामनेर तालुक्याला मिळेल अशी जाणकारांमध्ये चर्चा सुरु आहे.