गिरीष भाऊंच्या नेतृत्वावर असलेला जनतेचा विश्वास अधिक दृढ होणार _ नगराध्यक्षा साधना महाजन
गिरीष भाऊंच्या नेतृत्वावर असलेला जनतेचा विश्वास अधिक दृढ होणार _ नगराध्यक्षा साधना महाजन
जळगाव प्रहार – वृषभ इंगळे
जामनेर –विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नामदार गिरीष महाजन यांच्या प्रचाराचा शुभारंभ परंपरेप्रमाणे सिद्धगड भवानी माता मंदिर येथे नारळ फोडून आज करण्यात आला.
या प्रचार मोहिमेच्या माध्यमातून जामनेर विधानसभा मतदारसंघाचा श्री. गिरीष महाजन यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास अधिक दृढ होईल ही मला खात्री आहे. असा विश्वास नगराध्यक्षा साधना महाजन यांनी यावेळी व्यक्त केला .
या प्रसंगी संजय दादा गरुड , तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर ,गोविंद अग्रवाल . जे के चव्हाण , प्रदिप लोढा , विलास राजपूत यांच्या सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
जामनेर शहरासह ग्रामीण भागात विविध योजनेच्या माध्यमातून विकास कामे केली आहे , त्यामुळे विरोधकांकडे कोणताच मुद्दा शिल्लक नाही .
कार्यकर्त्यांची मोठी फळी आपल्या कडे आहे , सदैव जनतेच्या सेवेत कार्यरत आहे , त्यामुळे आपलाच विजय निश्चित असल्याचा दावा नामदार गिरीश महाजन यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला .