Blog
महायुती सरकारने केलेली विकास कामे गावा गावात सांगा — गिरीश महाजन
महायुती सरकारने केलेली विकास कामे गावा गावात सांगा — गिरीश महाजन
जळगाव प्रहार – वृषभ इंगळे
जामनेर –विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आज जामनेर येथे संपन्न झाला.
महायुती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागाने प्रगतीचे सुवर्णयुग अनुभवले. सर्वांगीण विकासाची हीच परंपरा अखंडितपणे पुढेही सुरू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने महायुतीला बळ द्यायचं आहे, गेल्या २.५ वर्षांत झालेली विकास कामे गावागावात पोहोचवून आपल्या विकसनशील धोरणावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करायचा आहे असे आवाहन नामदार गिरीश महाजन यांनी सर्वांना केले.