देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा — नामदार गिरीश भाऊ महाजन
देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा — नामदार गिरीश भाऊ महाजन
जळगाव प्रहार – वृषभ इंगळे
जामनेर — निश्चित आमची अपेक्षा हीच आहे की , राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच व्हावे कारण एवढा मोठा स्ट्राईक रेट आमचा आहे , मोठ्या प्रमाणात आमदार भाजपाचे आमचे निवडूण आले आहे त्यामुळे साहजीक आहे , आमचा नेता हा मुख्यमंत्री यावेळी व्हावा अश्या स्पष्ट भावना प्रतिक्रिया नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी दिल्या .
जामनेर विधानसभा मतदार संघातून सातव्यांदा आमदार म्हणून गिरीश महाजन निवडूण आले आहे .
जामनेरात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी विजयी झाल्या नंतर प्रतिक्रिया व्यक्त केल्या .
जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्व जागा शाबुत राहिल्या आहेत .
१००टक्के निकाल महायुतीच्या बाजुने मतदारांनी दिला आहे .
त्याबद्दल सर्व मतदारांचे , कार्यकर्त्याचे आभार त्यांनी मानले .
लोकसभेच्या निकाला नंतर आम्ही धडा घेतला , सुक्ष्म नियोजन आम्ही केले , सर्व कार्यकर्त्यांनी परिवाराने मोठी मेहनत घेतली त्यामुळे हे यश मिळाले असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले .
भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांना १ लाख २८ हजार ६६७ मते मत राकॉ शरदपवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांना १०१७८२ मते मिळाली .
२६८८५ मतांनी आ ,गिरीश महाजन विजयी झाले आहे .
रिंगणात एकूण १० उमेदवार होते .
निवडणूक निकाल मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली .
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना मोरे , तहसिलदार नाना साहेब आगळे यांनी व त्यांचे महसुल टीम ने काम पाहिले .