स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य महाविद्यालय आणि आय.एम.आर.जामनेर संविधान दिन साजरा..
जामनेर – स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य महाविद्यालय आणि आय.एम.आर.जामनेर संविधान दिन साजरा…. संविधानाबद्दल आपण साक्षर असले पाहिजे, संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी कशी होते यामध्ये नागरिकांनी लक्ष घातले पाहिजे ,संविधानात मार्गदर्शक सूचना केलेले आहेत त्यांचे पालन राज्यकर्त्यांकडून केले जात आहे किंवा नाही याबाबत सतर्क असले पाहिजे, राज्यांचा जो काही विकास होतो त्या विकासाचे समान वाटप झाले पाहिजे सर्वांना न्याय हक्क मिळाला पाहिजे आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे असाच राज्य सरकारांचा कारभार असला पाहिजे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या संविधानातील मूलभूत हक्कांचे जतन केले जात आहे किंवा नाही, स्वातंत्र्य समता, बंधुता, सामाजिक न्याय हे मूल्य रुजविणारे भारतीय संविधान जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानापैकी एक आहे आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिक वर्ष लोटलेली आहेत तरीही भारत एक संघ आहे हे केवळ संविधानामुळे घडलेले आहे शोषित ,पीडित आणि वंचितांना न्याय हक्क संविधानने मिळून दिलेला आहे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधानाचा स्वीकार केल्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.अशी माहिती प्र. प्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी यांनी दिली. तत्पूर्वी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधानाचे पूजन करण्यात आले त्यानंतर सामूहिक भारतीय संविधानाच्या उपदेशीका चे वाचन करण्यात आले यावेळी आय. एम .आर .संचालक डॉ. किशोर पाटील यांनीही संविधानाबद्दल मार्गदर्शन केले यावेळी प्राध्यापक तेजश्री पाटील, रूपाली पाटील, सोनाली चौधरी, सुजाता पाटील, शिवानी चौधरी, जयश्री डाबरे, श्री प्रदीप माळी आदी मान्यवर उपस्थित होते.