Blog

परिवर्धा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत काथर्दे खुर्द शाळेची दमदार कामगिरी.

परिवर्धा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत काथर्दे खुर्द शाळेची दमदार कामगिरी.

शहादा दि.२१ (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत शहादा तालुका परिवर्धा केंद्रस्तर झालेल्या क्रीडा स्पर्धेत जि. प. प्रा. शाळा काथर्दे खुर्द या शाळेने दमदार कामगिरी करत खो-खो कबड्डीत लहान गट मुले या क्रीडा प्रकारात वर्चस्व कायम ठेवले आहे.

काथर्दे खुर्द शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. मौजे काथर्दे खुर्द ता शहादा जिल्हा नंदुरबार येथे दि.१९\१२\२०२४ रोजी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख अशोक देवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी बीट नं.१ तथा गटशिक्षणाधिकारी धडगाव डी.डी.राजपुत, डॉ योगेश सावळे गटशिक्षणाधिकारी शहादा, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, पंचायत समिती सदस्य सुदाम पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संगीता पाडवी, सरपंच खंडु ठाकरे, उपसरपंच गणेश भील पोलिस पाटील ईश्वर वळवी, गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रदिप पाटील, दिलीप पाटिल, धरमदास पाटील, रुपेश पाटील, गोरख आण्णा गिरासे, माया पाटील, शारदा पाटील, करुणा पाटील, विजया पाटील, शिला पाटील, मुख्याध्यापक बी.जी माळी, मुख्याध्यापक भरत पावरा यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, भुमिपुत्र शेतकरी उत्पादक गट काथर्दे खुर्दचे कपिल पाटील,भुषण पाटील तसेच भुमिपुत्र शेतकरी उत्पादक गटचे सन्माननीय सदस्य, शिक्षक उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीला काथर्दे खुर्द शाळेच्या स्वागतगीत, लेझीम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदर लेझीम पथकासाठी टि-शर्ट भुमिपुत्र शेतकरी उत्पादक गट काथर्दे खुर्द यांच्या सौजन्याने देण्यात आले. स्पर्धा वैयक्तिक व सांघिक अशा दोन प्रकारात पार पडल्या. वैयक्तिक स्पर्धा धावणे, लिंबु चमचा, गोणपाट, दोरी उड्या, लांब उडी, संगीत खुर्ची तसेच सांघिक स्पर्धा कबड्डी व खो-खो या प्रकारात होत्या.यातील वैयक्तिक स्पर्धेत तब्बल ९ तसेच सांघिक स्पर्धेत कबड्डी व खोखो मध्ये केंद्रातुन प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा परिषद मराठी शाळा काथर्दे खुर्द हि परिवर्धा केंद्रातील सर्वाधिक बक्षीस मिळवणारी शाळा ठरली. याबद्दलच गावातील सर्व लहान थोर मंडळी, शाळा व्यवस्थापन समिती, अधिकारी वर्ग, तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी मुलांची चिकाटी व मेहनत यांचे कौतुक केले. सदर यशात मुलांची मेहनत सर्व पालक वर्ग, शाळेचे मुख्याध्यापक भरत पावरा, उपशिक्षक श्रीकांत वसईकर, खेमा वसावे, हर्षदा पाटील, तुकाराम अलट यांचा मोलाचा वाटा आहे असे मत केंद्रप्रमुख श्री. देवरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट, प्रास्ताविक श्री. अमृत नामदेव पाटील बक्षीस वितरण श्री. शक्ती धनके यांनी तर आभार श्री. ज्ञानोबा सुरनर यांनी मानले. या सर्व क्रीडा प्रकारात प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून आपला दबदबा कायम ठेवला आहे. काथर्दे खुर्द शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व खेळाडू विषयी शालेय व्यवस्थापन समितीकडून कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}