Blog
जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी पाटबंधारे योजनांचा घेतला आढावा

जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी पाटबंधारे योजनांचा घेतला आढावा
जळगाव प्रहार
जळगाव -जळगाव येथील ‘तापी पाटबंधारे विकास महामंडळ’ कार्यालयात विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पाटबंधारे योजनांच्या प्रगतीचा आढावा जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी घेतला व पुढील कामकाजासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी श्री व्ही डी पाटील , मुख्य अभियंता श्री बोरकर , धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री सोनवणे , कार्यकारी अभियंता श्री गोकुळ महाजन , कार्यकारी अभियंता श्री विनोद पाटील , श्रीमती आदिती कुलकर्णी , नंदुरबार येथील कार्यकारी अभियंता खैरनार ,यांचेसह विभागातील उपअभियंता , अधिकारी कर्मचारी हजर होते .



