Blog
बोदवड तहसिलदार अनिल वाणी सेवानिवृत्त

बोदवड तहसिलदार अनिल वाणी सेवानिवृत्त
जळगाव प्रहार
जामनेर –महसूल विभागात तलाठी या पदापासून सेवेला सुरुवात करुन तहसीलदार पदापावेतो आपल्या प्रदीर्घ सेवेतून जनतेला सेवा प्रदान करणारे तहसीलदार श्री. अनिल वाणी साहेब आज नियत वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त झाले.
त्यांनी मागील वर्षभरापासून जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे तहसीलदार पदी कर्तव्य बजावले.
राष्ट्राला त्यांनी समर्पित भावनेने दिलेल्या योगदानाबद्दल व भावी निरोगी दीर्घायुष्यासाठी जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी श्री. अनिल वाणी यांचा सहकुटुंब सन्मान केला.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्री. विजय ढगे यांची उपस्थिती होती.



