पाटबंधारे प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम अदा करा — नामदार गिरीश महाजन

पाटबंधारे प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम अदा करा — नामदार गिरीश महाजन
आपला पत्रकार मच्छिंद्र इंगळे
मुंबई –पाटबंधारे प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या भूसंदर्भ प्रकरणांमध्ये पॅरिटीच्या आधारावर केलेल्या तडजोड प्रकरणातील रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तातडीने दिली जावी, असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी व कोकण खोरे पाटबंधारे विभाग नियामक मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अतुल कपोले, तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक ज. द. बोरकर, जलसंपदा विभागाचे सह सचिव अभय पाठक व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



