पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती प्रशिक्षण योजना राबवावीः- प्रदेशाध्यक्ष मुकेश साळुंके

पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती प्रशिक्षण योजना राबवावीः- प्रदेशाध्यक्ष मुकेश साळुंके
प्रतिनीधी –
पारधी क्रांती संघटना नेहमी समाज हितासाठी विविध उपक्रम राबवित असून आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांना निवेदन देण्यात आले होते कि पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरती प्रशिक्षण योजना राबविण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांनी ही मागणी मंजूर करून दरवर्षी जळगाव जिल्ह्यातील पारधी समाजाच्या ५० विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरती प्रशिक्षण योजना राबविण्यात आली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. राहण्याचा जेवणाचा व इतर खर्च प्रकल्प कार्यालय मार्फत करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा पोलिस कार्यालय यांच्या मार्फत जाहिरात दिल्या जाणार आहे .



