आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त बनसोडे मॅडम यांच्या बरोबर पारधी व पारधी समाजाच्या पोट जमातीची एकमेव संघटना म्हणजेच आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली

*दि.१८ मार्च २०२५ रोजी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त बनसोडे मॅडम यांच्या बरोबर पारधी व पारधी समाजाच्या पोट जमातीची एकमेव संघटना म्हणजेच आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती आयुक्त मॅडम यांच्या बरोबर बैठक आयोजित करण्याचा उद्देश पारधी समाजातील बीड जिल्ह्यातील सतिष भोसले उर्फ खोक्या यांच्या घरावर शासनाकडून बुलडोझर फिरवून सर्व घर जमीन ध्वस्त करण्यात आले व सर्व परिवाराला बेघर करण्यात आले म्हणून आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळा च्या वतीने आयुक्त मॅडम यांच्या बरोबर चर्चा करुन सतिष भोसले उर्फ खोक्या भोसले यांच्या परिवाराला त्वरित घरकुल व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात याबाबत निवेदन देण्यात आले. तसेच आदिवासी विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील पारधी व पारधी समाजाच्या सर्व पोट जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी पारधी विकास आराखडा प्रभावीपणे अंमलबजावणी करावे तसेच स्वतंत्र पारधी घरकुल योजना, सुशिक्षित बेरोजगारांना चारचाकी वाहने,मिळणे, स्वाभिमानी सबलीकरण योजना मार्फत ४ एकर बागायती किंवा ८ एकर कोरडवाहू जमीन देण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर , थ्रेशर वीजपंप इत्यादी योजना राबविण्यात याव्यात, पारधी समाजातील युवकांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, स्मशानभूमीसाठी जागा व बांधकाम करून मिळावे, केंद्रातील मोठे उद्योग पारधी समाजासाठी सुरू करावे, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मानधन मिळावे, पारधी समाजातील लोकांसाठी सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणे, पारधी वस्तीत समाज मंदिर बांधुन देण्यात यावे, पारधी विद्यार्थ्यांना पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण योजना राबविणे, पारधी समाजातील भगत जोखारे यांना शासनाकडून मानधन मिळावे, पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्यात याव्यात,ms cit प्रशिक्षण मोफत मिळणे बाबत, पारधी समाजातील बांधकाम लोकांना बांधकाम पर्यवेक्षक कोर्स मोफत उपलब्ध करून देणे इत्यादी योजनांची मागणी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त बनसोडे मॅडम यांना आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले यावेळी उपस्थित आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे राज्य महासचिव श्री दिपकभाऊ खांदे (सुर्यवंशी), राज्य सचिव श्री सुरेश सोनवणे, राज्य सचिव अमोल सुर्यवंशी, जेष्ठ सल्लागार श्री रमेश साळुंखे, खान्देश अध्यक्ष श्री विनोद भाऊ साळुंके, खान्देश अध्यक्षा महिला सुशिला ताई सोनवणे, मुंबई अध्यक्षा प्रभावती ताई पारधी, नाशिक जिल्हाध्यक्ष श्री धीरज राणे, धुळे जिल्हाध्यक्ष श्री कमलेश चव्हाण सर, परभणी जिल्हाध्यक्ष श्री गोविंद पवार, नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब काळे,श्री संजय साळुंके सर, श्री शामकांत चव्हाण सर, धुळे जिल्हा संघटक सतिश भाऊ चव्हाण, श्री जसपाल चव्हाण, नितीन सुर्यवंशी, गणेश राणे,राजु दाभाडे, लक्ष्मण साळुंके, दिपक चव्हाण, स्वप्निल शिसव सर, बापू चव्हाण,विजय(राजु) चव्हाण, नामदेव चव्हाण,भुरा भाऊ साळुंके,शालीकराम साळुंके, महिला आघाडी संगिता चव्हाण, सुनिता पवार, रेखा पवार,भारती चव्हाण,सिमा चव्हाण, सारिका शिंदे,भुरा पारधी,महाराष्ट्र भरातुन २८ जिल्ह्यातील आदिवासी पारधी क्रांती पदाधिकारी यांनी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त मॅडम यांच्या बरोबर चर्चा करुन पारधी समाजासाठी योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करावे या बाबत निवेदन दिले*



