जळगाव तापी पाटबंधारे विकास महामंडळ मुख्य अभियंता पदी श्री राजेश मोरे यांची वर्णी लागणार
जामनेर – प्रतिनीधी वृषभ इंगळे
तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा मुख्यअभियंता पदाचा पदभार श्री. राजेश मोरे साहेब हे स्विकारत असल्याचे असे खात्री लायक वृत्त आहे , श्री. बोरकर साहेब मुख्यअभियंता यांच्या जागी श्री. राजेश मोरे यांना पदोन्नती मिळत असल्याने तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव मुख्यअभियंता पदाचा पदभार
श्री. राजेश मोरे यांना मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे, श्री. बोरकर साहेब यांचा 4 वर्षाचा बदलीचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची मंत्रालयात बदली होणार आहे.
श्री. राजेश मोरे कार्यकारी अभियंता असताना वाघूर उपसा सिंचन योजना बाबत चे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले , त्यांना कामाचा गाढा अभ्यास असल्याने रखडलेले प्रकल्प गतिशील होउन कामात गुणवत्ता येणार आहे.
सक्षम, कार्यक्षम, पारदर्शक अधिकारी म्हणुन त्यांची ख्याती आहे . बुद्धीमान व्यक्तीमत्व , बोलणे अतिशय कमी आणि काम मात्र करण्याची हातोटी पर्वता सारखी , अतिशय शांत पण प्रसिद्धी पासुन पूर्णताः दूर कामाचा झपाटा तरुणांना सुद्धा त्ताजवणारा , काम वेळेत पूर्ण करण्याची जिद्द , कार्यक्षमपणा अशी श्री . राजेश मोरे साहेब यांची काम करण्याची हातोटी असल्याचे सांगण्यात येते .



