Blog

जामनेर शिक्षण विभागात तीन जणांना शिक्षण विस्तार अधिकारी पदी पदोन्नती  

जामनेर शिक्षण विभागात तीन जणांना शिक्षण विस्तार अधिकारी पदी पदोन्नती

आपला पत्रकार मच्छिंद्र इंगळे

जामनेर — पं.स जामनेर शिक्षण विभागात तीन जणांना शिक्षण विस्तार अधिकारी पदी पदोन्नती मिळाली आहे , संबंधितांनी तात्काळ आपला पदभार घेवून कामकाज सुरुवात केली आहे .

पदोन्नती झालेल्या मध्ये श्री संजय भानुदास पाटील ( केंद्र प्रमुखा गारखेडा ), पितांबर राठोड , राजमल मगन महाजन ग्रेडेड मुख्याध्यापक पळासखेडे मिराचे , यांचा समावेश आहे .

शिक्षण विभागातील बारीक सारीक जाणकारी , प्रत्येकाशी आपुलकीचे , जिव्हाळ्याचे नाते , कामात कार्यक्षम पणा , प्रत्येकाचे तक्रार समस्या निवारण करण्याची हातोटी संबंधीत अधिकारी यांच्यात आहे , त्यामुळे शिक्षण विभागातील प्रश्न व कामे जलद गतीने मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .

याबाबत नुकतेच मिनल करनवाल (भा प्र से ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी तसे आदेश काढले आहे .

 

शिक्षण विस्तार अधिकारी पदी कार्यक्षम व्यक्तींची निवड झाल्याने शिक्षण विभागातील रेंगाळलेली कामे , अनेकांच्या तक्रारी , अडी अडचणी नक्कीच दुर होतील अशी अपेक्षा त्यांचे कडून व्यक्त होत आहे

पुढील वाटचालीस त्यांना आपला पत्रकार व दैनिक जळगाव प्रहार कडून खूप खूप शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}