जामनेर पंचायत समिती मध्ये माहिती अधिकार कायदयाची अधिकारी , कर्मचारी कडून उडवली जाते खिल्ली !
जि.प सीओ यांनी लक्ष देण्याची जन सामान्यांची अपेक्षा
आपला पत्रकार मच्छिंद्र इंगळे
जामनेर – जामनेर पंचायत समिती मध्ये माहिती अधिकार अंतर्गत येणारे अर्ज व त्यावर केले जाणारे प्रथम अपिल अर्ज यांच्या बाबत दुसरी कडे वर्ग केले जाणारे वेळ , अपिल तारखा याबाबत जाणून बुजून दिरंगाई चालढकलपणा केला जात असल्याने माहिती अधिकार कायदया ची एक प्रकारे संबंधीत जन माहितीअधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांचे कडून खिल्ली उडवण्यात येत असुन जो न्याय मागणी साठी लढत आहे तो वंचित राहत असल्याची चित्र आहे .
पंचायत समिती जामनेर येथे काही अधिकारी , कर्मचारी यांना एकाच टेबलवर एकाच ठिकाणी बरेच वर्षांचा कालावधी लोटला आहे ,
संबंधीतांची बदली होत नसल्याने तसेच सदरील अधिकारी , कर्मचारी गावातीलच असल्याने त्यांचे राजकीय पक्षांचे नेत्यांशी जवळचे संबंध आल्याचे बोलले जात आहे .
त्यामुळे काहीजण च्या वागण्या बोलण्यात सर्व सामान्य नागरिकांशी वागतांना , बोलतांना कमालीचा गुर्मी पणाचा फरक जाणवत असल्याचे अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत .
एखादया नागरिकाने माहिती अर्ज सादर केल्यास त्याला महिनाभर काहीच पत्र व्यवहार केला जात नाही , त्यावर प्रथम अपिल दाखल केल्यावर त्याची सुनावणी होते माहिती देण्याचे आदेश होतात , मात्र कोणत्याच प्रकारची माहिती दिली जात नसल्याचे प्रकार घडत आहे .
त्यामुळे प्रथम अपिलात करण्यात आलेले आदेशाचे महत्व तरी काय ? असा प्रश्न विचारला जात आहे .
की जाणून बुजून संबंधित अर्जदाराला जेरीस आणण्याचे प्रयत्न तर होत नाही ना ?
असाही सवाल निर्माण होत आहे .
तरी या चालेलेल्या गंभीर प्रकाराकडे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी लक्ष द्यावे व ज्यांना माहिती अधिकार कायदयाचे ज्ञान नाही अश्या अधिकारी कर्मचारी यांचेसाठी माहिती अधिकार कायदयाचे शिबीर आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .



