हवेत गोळीबार करू नका , माझ्या बद्दल काही पुरावे असल्यास समोर बिनधास्त सादर करा — जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन
गिरीश भाऊंनी मीडिया समोर दाखवले फोटो यांची ही चौकशी करणार का ? केला प्रश्न

- हवेत गोळीबार करू नका , माझ्या बद्दल काही पुरावे असल्यास समोर बिनधास्त सादर करा — जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन
मच्छिंद्र इंगळे
जामनेर — स्वर्गीय निखील एकनाथ खडसे याने आत्महत्या केली की त्याचा खून केला याची चौकशी व्हावी , रॉकेल टाकून मोटार सायकल फिरवणारे खडसे यांचे कडे करोडो रुपयांची संपत्ती आली कोठून ? याची चौकशी करा या व इतर अश्या मागण्या जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यानेच मागेच एका व्हीडीओ प्रसारीत करून केलेली आहे .
ही मागणी आमची होती का ?
याच प्रफूल लोढा सोबत रा कॉ शिवसेना व इतर पक्षाचे नेत्यांचे , फोटो आहेत , मग यांचा ही चौकशी करणार आहात का ?
की त्या फोटो चे सत्य नारायण करायचे असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे .
रा कॉ शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे बाबत केलेल्या आरोपा विषयी
लोढा चा जुना व्हीडी ओ / फोटो प्रसारीत करून या प्रकरणाची चौकशी व्हावी व गंभीर आरोप केले आहे .
या आरोपांचे समाचार घेत मंत्री गिरीश महाजन यांनी आज जामनेर निवास स्थानी पत्रकार परिषद घेऊन आरोपाचे खंडन केले .
हवेत काहीही गोळीबार करायचा नाही , मुर्खा सारखे काहीही बडबडायचे यापुढे नाही , काय पुरावे असेल बिनधास्त जनतेसमोर , पोलिसा समोर सादर करायचे असा थेट इशाराच गिरीश महाजन यांनी बोलतांना दिला आहे .
लोक त्यांना स्वीकारायला तयार नाही , मतदार त्यांचे पासुन लांब चाललेले आहे , ठिक ठिकाणी अपयश पदरी येत आहे , त्यामुळे ही लोक अस्वस्थ झाली आहे .
राजकीय खेळीने गिरीश महाजन ला शह देऊ शकत नाही , जिल्ह्यात आपल काही चालत नाही , मग बदनाम कस करायच तर काही तरी बड बडायच , खोटे बोलायचे याला फुकट प्रसिद्धी मिळते , त्यासाठी हे यांचे उदयोग सुरु असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले .
सर्व आता हातातून गेल्याने उठता बसता खडसे यांना गिरीश महाजनच दिसत असतो ,
व त्यामुळे ते वाट्टेल ते बोलत असतात .
सुतावरून स्वर्ग साधण्याचा प्रयत्न करीत असतात .
मात्र मला खडसे यांच्यावर खालच्या स्थरावर जाऊन आरोप करायचे नाही . फक्त त्यांना एकच सांगणे बोलतांना तारतम्य बाळगावे असा सल्ला व इशारा त्यांनी शेवटी बोलतांना दिला .




